Posts

Showing posts from January, 2010

गे-पर्र-ई (१९६२) - स्वप्न आणि सत्य यातील तफावत

Image
चित्रपट पाहून आपणही नटी बनू शकतो, असा समज बाळगून दररोज कित्येक तरूणी आपलं छोटंमोठं गाव, नातेवाईक यांना सोडून मायानगरीत दाखल होतात. त्यातील कित्येकजणींना आपलं स्वप्न पहिल्याच प्रयत्नात विसरून वास्तवाचे चटके सहन करत आयुष्य कंठावं लागतं. स्वत:च्या हट्टापायी घरी सोडलेलं म्हणून आईवडीलांना तोंड दाखवायची हिम्मत नाही आणि जे हवं ते करायचं सोडून, पोट भरण्यासाठी तिसरंच काहीतरी करावं लागतंय अशी दुरावस्था असलेल्या मुली शहरात कमी नाहीत. त्यातून एखादी मुलगी स्वाभिमानाने आपल्या अटींवरच या मायानगरीत तग धरून रहायचं म्हणत असेल, तर तिला काय सहन करावं लागेल, याची कल्पनाच न केलेली बरी. अशाच परिस्थितीशी साम्य असलेला प्राण्यांचा अॅनिमेशनपट म्हणजे गे पर्र-ई. म्युझेट नावाची फ्रान्समधील एका छोट्या गावात रहाणारी एक मांजरी. दिसायला खूप आकर्षक आणि चंचल पण तितकीच भोळी. जॉन टॉम नावाच्या बोक्याचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. तो तिच्यासाठी गाणी गातो पण आपलं प्रेम त्याने कधी तिच्यासमोर मोकळेपणी व्यक्त केलेलं नाही. जॉन टॉमचा मित्र रॉबस्पिअरला जॉनचं म्युझेटच्या मागे मागे फिरणं अजिबात आवडत नाही पण केवळ मित्रप्रेमाखातर तो...

द नंबर ट्वेन्टी थ्री (२००७) - कल्पनेपलिकडचं भीषण सत्य

Image
सत्य समजून घेतल्यानंतरची घालमेल आणि अज्ञानातील सुख याची तुलना केली तर अज्ञानातील सुखाचीच अपेक्षा प्रत्येकजण करेल. पण जे माहित नाही, ते माहित करून घेणं हा मानवी स्वभाव आहे. त्या स्वभावधर्मानुसार वागल्यानंतर जे काही आपल्यासमोर येतं, त्याची तुलना केवळ वास्तव व अनभिज्ञता या दोन पारड्यांमधे करता येत नाही. घडून गेलेले वास्तव हे सत्य होतं व आपण त्यापासून अनभिज्ञ होतो ही वस्तूस्थिती स्विकारून समोर आलेली परिस्थिती नैतिक व अनैतिकतेच्या कसावर पारखून पहावी लागते. ही एक मोठी कसोटी आहे. या कसोटीवर पूर्ण उतरण्यासाठी आवश्यक असलेलं मनोबळ ज्याच्याकडे असतं, केवळ तोच सत्य जाणून घेण्यामागची उत्सुकता व अज्ञानातील सुख याची तुलना केल्यानंतर त्यातून सत्य स्विकारू शकतो. वॉल्टर स्पॅरो हा भटक्या कुत्र्यांना पकडणारा एक अधिकारी आहे. एके दिवशी एका कुत्र्याला पकडण्याच्या नादात, तो कुत्रा वॉल्टरच्या हाताला चावतो आणि पळून जातो. त्याच दिवशी वॉल्टरचा वाढदिवसही असतो. वाढदिवसाची भेट म्हणून वॉल्टरची पत्नी अगाथा, त्याला एक पुस्तक भेट देते. या पुस्तकाचं नाव आहे ’द नंबर ट्वेन्टी थ्री’. या पुस्तकाच्या लेखकाने तेवीस क्रमां...

द ग्रीन माईल (१९९९) – अनंताचा प्रवास आणि अश्वत्थाम्याचं जगणं

Image
मृत्यूची शिक्षा ठोठावलेले कैदी ज्या तुरूंगात ठेवले जातात, त्या तुरूंगातील एका रांगेचा पॉल एजकोम्ब हा अधिकारी आहे. हा काळ आहे १९३० सालचा, जेव्हा कैद्यांना मृत्यूदंड देण्यासाठी इलेक्ट्रीक खुर्चीचा वापर केला जात असे. तुरूंगातील जमिनीवर बसवलेल्या फरशांच्या हिरव्या रंगावरून ह्या तुरूंगाला ग्रीन माईल असं म्हटलं जात असे. मृत्यूदंडासाठी आलेले कैदी काही दिवस त्या तुरूंगात राहत आणि त्यांच्या शिक्षेचा दिवस उगवला की ग्रीन माईलवरून चालत चालत आपल्या अनंताच्या प्रवासाला इलेक्ट्रीक खुर्चीच्या दिशेने निघून जात. या कैद्यांना पाहून पाहून पॉलची नजर इतकी निगरगट्ट झालीय की त्याचा दैव, नशीब या गोष्टींवर विश्वासच राहिलेला नाही. कैद्याच्या मृत्यूदंडाच्या एक दिवस अगोदर मृत्यूच्या शिक्षेची तालीम करणंही आता त्याच्या अंगवळणी पडलं आहे. पण एक दिवस एक कैदी त्याच्या तुरूंगात येतो आणि पॉलचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन साफ बदलून जातो. जॉन कॉफी हा अवाढव्य शरीर असलेला एक काळा कैदी पॉलच्या तुरूंगात दाखल होतो. त्याला दोन लहान मुलींच्या बलात्कार व खून प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते. खरं तर जॉनला पाहूनच तुरूंगाती...

द डेव्हिल वेअर्स प्राडा (२००६) – पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य

Image
अ‍ॅन्ड्रीया सॅक्स ही एक साधीसुधी रहाणारी पण तल्लख बुद्धीची पत्रकार असते. एक उत्तम पत्रकार होणं, हे तिचं ध्येय असतं. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी म्हणून तिचे प्रयत्न सुरु असतात. तशातच तिला संधी मिळते, ती ’रनवे’ सारख्या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी वार्ताहर म्हणून काम करण्याची. पण प्रत्यक्षात तिला निराळंच काम करावं लागतं. अ‍ॅन्ड्रीयाने जर एक वर्ष ’रनवे’ची कार्यकारी संचालक (एक्झिक्युटीव्ह) मिरांडा प्रिस्ले हीची दुय्यम सहाय्यक म्हणून काम केलं, तर ’रनवे’मधे वार्ताहर म्हणून अ‍ॅन्ड्रीयाचं भविष्य उज्ज्वल आहे, असं अ‍ॅन्ड्रीयाला सांगितलं जातं. ज्या नोकरीसाठी मुली वाट्टेल ते करायला तयार होतात, ती नोकरी अ‍ॅन्ड्रीयाला सहजगत्या मिळून जाते. अ‍ॅन्ड्रीया या नोकरीकडे फक्त एक चांगली संधी म्हणून पहात असते. एकदा का तिच्या प्रोफाईलवर ’रनवे’मधे मिरांडासाठी काम केलं असल्याचा रेकॉर्ड आला, की इतर ठिकाणी तिला नोकरी मिळण्यासाठी फार कष्ट करावे लागले नसते. पण लवकरच अ‍ॅन्ड्रीयाच्या लक्षात येतं की ’रनवे’मधे काम करायचं असेल, तर छान कपडे, छान केशभूषा असणं आवश्यक आहे. त्याहूनही आवश्यक आणि कठीण आहे, ते म्हणजे मिरांडा प्र...

सिंडरेला मॅन (२००५) - परिकथा वाटावी अशी एका बॉक्सरची सत्यकथा!

Image
जेम्स जे. ब्रॅडॉक, एक प्रतिथयश बॉक्सर. आपल्या बॉक्सिंगच्या कौशल्यावर त्याने खूप नाव कमावलंय. त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाहीये. सुंदर पत्नी, गोजिरवाणी मुलं, पैसा, प्रसिद्धी. जे जे माणसाला आपल्या आयुष्यात असावं असं वाटतं, ती प्रत्येक गोष्ट आहे जेम्सकडे. १९२८ सालचा सर्वोत्कृष्ट मुष्टीयोद्धा आहे तो. पण जर सगळं आहे तसंच सुरळीत चालू राहिलं असतं, तर दैव कशाला म्हटलं असतं बरं! १९२९ ते १९३३, ग्रेट डिप्रेशनचा काळ! दुस-या महायुद्धाची चाहूल लागत होती. जागतिक अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडून गेलेली. जेम्सचं पूर्वीचं वैभव, दिमाख पार धुळीला मिळालंय. पण फक्त जेम्सच नाही तर त्याच्यासारख्या कित्येकांनी स्टॉक मार्केट मधे गुंतवलेले आपले पैसे गमावल्याने त्यांच्यावर ही वेळ आलीय. कित्येकजण बेकार झालेत. कित्येकजण आपलं घर, कुटुंब सोडून परागंदा झालेत. कित्येकजण काम मागत फिरतायंत. कित्येकांनी निदान आपल्या मुलांना तरी दोन वेळ पोटभर जेवता यावं म्हणून काही सधन घरांमधे आश्रयासाठी पाठवलंय. पण जेम्स मात्र आपल्या मोठ्या मुलाला वचन देतो की काहीही झालं तरी तो आपल्या मुलांना स्वत:पासून वेगळं करणार नाही. अधूनमधून म...

थ्री इडियट्स (२००९) – ऑल इज वेल

Image
थ्री इडियट्स म्हणजे कोपरखळ्या मारत विनोदाच्या अंगाने आपल्याला वास्तवाचं दर्शन घडवणारा चित्रपट! चित्रपटात इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी केवळ कथानकासाठी वापरली आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना येणा-या अडचणी हल्ली सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. डेडलाईन्स, व्यवसायिक स्पर्धांसारखी आव्हानं, आणि कौटुंबिक जबाबदा-या यांचा ताळमेळ बसवताना माणसातील जिवनेच्छा पार कोमेजून जाते. त्यातच जर करिअर म्हणून निवडलेलं क्षेत्र आपल्यावर लादलं गेलेलं असेल, तर होणारी मनाची घुसमट कुणाला सांगता न येण्यासारखी! राजू रस्तोगी, फरहान कुरेशी आणि रणछोडदास श्यामलदास चांचड उर्फ रॅंचो या इंजिनिअरींग कॉलेजमधे शिकणा-या तीन मित्रांची ही कथा. हे तिघे एकमेकांचे घट्ट मित्र असतात. पण शेवटच्या वर्षी इंजिनिअरिंगची डिग्री मिळाल्यावर रॅंचो कुणाचाही निरोप तडकाफडकी निघून जातो. तो कुठे जातो, काय करतो हे कुणालाच कळत नाही. हवेत विरल्यासारखा तो पाच वर्षे गायब असतोआणि एक दिवस असा उगवतो, जेव्हा राजू आणि फरहान रॅंचोला शोधण्यासाठी आपली कामं सोडून धावतात. रॅंचोला शोधण्याच्या प्रवासात या तीन मित्रांची कथा आपल्यासमोर तुकडयातुकड्...

मेमोअर्स ऑफ अ गेइशा (२००५) - तिच्या आठवणींचा प्रवास

Image
चेहे-यावर रंगरंगोटी केल्यावर खरा चेहेरा ओळखू न येण्याइतपत बदलला असला, तरी मनावर तशी रंगरंगोटी करता येत नाही. नदी ज्याप्रमाणे आपला रस्ता शोधत शोधत समुद्राला जाऊन मिळते, स्त्रीही त्याचप्रमाणे आपल्या प्रेमाच्या शोधात असते. एकदा का तिला तिचं प्रेम सापडलं की तिचा शोध संपतो आणि सुरू होतो प्रवास त्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी. अशाच प्रवासाची कहाणी आहे - मेमोअर्स ऑफ अ गेइशा. मासेमारीवर उदरनिर्वाह भागविणा-या कोळ्याच्या दोन मुली तात्सु आणि चियो ह्या जपानच्या क्योटो शहरामधील गेइशा गृहाला विकल्या जातात. तात्सु ही मोठी बहीण आणि हुबेहुब आईसारखे डोळे घेऊन जन्माला आलेली चियो ही धाकटी बहीण. तात्सुमधे गेइशा बनण्याचे मुलभूत गुणच नसतात त्यामुळे तीची रवानगी वेश्यागृहात होते आणि नऊ वर्षाच्या चियोला गेइशा गृहात छोटी मोठी कामं करावी लागतात. चियो लहानपणापासूनच देखणी असल्याने गेइशा गृहाची प्रमुख गेइशा हात्सुमोमो हिचा तिच्यावर विशेष राग असतो. गेइशागृहातील पम्पकीन नावाची एक मुलगी चियोला सांभाळून घेत असते. चियोची आणि तिची मैत्री जमते पण बहीणीपासून ताटातूट झाल्यामुळे चियोच्या डोक्यात वारंवार आपल्या बहीणीला भे...

नटरंग उभा, ललकारी नभा, स्वरताल जाहले दंग! (२००९)

Image
’एका कलाकाराच्या आयुष्याचा तमाशा’, या चार शब्दांमधे नटरंगची कथा सामावलेली आहे. आयुष्यभर कलेसाठी दिलेलं योगदान म्हणून एखाद्या ज्येष्ठवयीन कलाकाराला जेव्हा ’जीवनगौरव पुरस्कार’ सारखा सन्मान लाभतो, तेव्हा तिथे टाळ्या वाजवणारे असंख्य हात उपस्थित असतात. त्यातल्या कित्येक हातांना त्या कलाकाराचं नेमकं योगदान किती आणि काय, हेही ठाऊक नसतं. कलेसाठी केलेल्या खडतर तपश्चर्येचा साक्षिदार असतो, तो त्या पुरस्काराचा मानकरी कलाकार आणि ज्यांनी त्याची तपश्चर्या अगदी जवळून पाहिली आहे, असे त्याचे सोबती. कागलगावचा गुणवंत वृत्तीने मल्ल पण हाडाचा कलाकार आहे. व्यायाम करून आपल्या शरीराचा मर्दानी बाज राखणारा हा गुणा, मनाने मात्र कवी आहे, उत्तम अभिनेता आहे. दिवसभर दुस-याच्या शेतावर राबून, आपल्या कुटुंबासाठी मजूरी करताना, संध्याकाळी मात्र फडावरची घुमणारी ढोलकी त्याला साद घालीत असते. गुणाला कलेचं अभिजात अंग आहे. तो उत्तम कवनं करू शकतो, त्यामुळे त्याच्यासाठी लावणी म्हणजे नुसती फडावर नाचणारी बाई नाही. तमाशा म्हणजे त्याच्यासाठी गीत, नृत्य, संगीत आणि सौंदर्य याची रेलचेल असलेला असा दरबार आहे. पण नुसती कला पाहून नि कला...