Posts

Showing posts from July, 2021

Varathan (2018)

Image
चित्रपट: Varathan (2018) वरदन -Outsider उपलब्ध: Disney Hotstar URL: येथे क्लिक करा. मूळ चित्रपट: Straw Dogs (1971) सारांश: अबिन नोकरी गमावल्यामुळे आणि प्रिया गर्भपातामुळे दुबईतलं वास्तव्य सोडून केरळमध्ये प्रियाच्या आजोळी काही महिने बदल म्हणून राहायचं ठरवतात. पण त्या ठिकाणी गेल्यावर ते एका निराळ्याच संकटात सापडतात. प्रिया वारंवार अबिनला संकटाची जाणीव करु देऊ पाहाते पण अबिन कधी त्याच्या शांत स्वभावामुळे तर कधी परिस्थितीमुळे दुर्लक्ष करत राहातो. त्याचा थंड प्रतिसाद पाहून प्रियाचा त्रागा होतो. सतत कात्रीत पकडणाऱ्या त्या अडचणीवर तिला एक कायमचा उपाय हवा असतो. पण तो मिळण्याची आशा मात्र तिने सोडलेली असते. मग प्रिया त्याच संकटाला वारंवार तोंड देत राहाते का? अबिनची प्रतिक्रिया काय असते? ह्या प्रश्नांची उत्तरं जाणूण घेण्यासाठी वरदन पहावा लागेल. चित्रपटाची सुरुवातीची २० मिनिटं अबिन-प्रियाचं आयुष्य, गाणं आणि त्यांच्या केरळपर्यंतच्या प्रवासाच्या चित्रीकरणामुळे कंटाळवाणी वाटतात. पण २० व्या मिनिटानंतर चढत्या क्रमाने थरार सुरु होतो आणि तो शेवटपर्यंत कायम राहातो. मानवी वृत्तीची हिणकस बाजू