Posts

Showing posts from 2022

रान बाजार

Image
रानबाजार वेबसिरीज पाहिली. ह्या सिरीजला मराठी क्राईम थ्रिलरमध्ये सर्वात वरचं स्थान मिळायला हवं. मालिकेच्या एकेका भागातून अलगदपणे रहस्य उलगडत जातं आणि तो प्रवास कंटाळवाणा नाही हे विशेष. ह्या मालिकेचा दुसरा सिझन येईल असं काहीजण म्हणत होते पण तसं वाटत नाही. ह्या कथेचा अंत तिथेच व्हायला हवा. अर्थात्‌ हे माझं मत झालं.  अभिनय सर्वांचाच आवडला. रोल लहान असो कि मोठा, सर्वांनीच समरसून काम केलं आहे. प्राजक्ता माळी सुरुवातीचे दोन एपिसोड तिच्या हास्यजत्रेतील प्रतिमेमुळे गोड, गुप्पू मुलगी वाटत राहाते पण नंतर ‘रत्ना’ अपील होते. तेजस्वीनी पंडित सुंदर आणि नाजूक दिसते. ही मालिका खूप बोल्ड आहे, शिव्यांचा भडिमार आहे असं बरंच ऐकलं होतं पण स्वत: मालिका पाहिल्यानंतर कळलं कि जितकं आवश्यक आहे तितकंच दाखवलं आहे. डोळ्यांना डिस्टर्ब करेल, मेंदूला झिणझिण्या आणेल असं काहीही दाखवलेलं नाही. सेक्स वर्कर्स, पोलिस, राजकारणी आपल्या खासगी आयुष्यात जसे बोलतील, वागतील तसंच दाखवलं आहे पण त्यातही मर्यादा राखलेली आहे. राजकारण्यांच्या गाडीवर, पोलिसांच्या व्हॅनवर आणि वेश्येच्या दरवाज्यावरच्या दिव्याचा रंग लालच असतो. त्या प्रत्येक

सरसेनापती हंबीरराव

Image
तुम्ही ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ गाणं ऐकलं असेल. आता ‘सात दौडती सात’ ह्या गाण्याचा पडद्यावरला शेवट तुम्हाला काय जाणीव देऊन जातो हे अनुभवायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा. स्वराज्याशी, छत्रपतींशी निष्ठावान असणे म्हणजे काय हे पहायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा. शेतकऱ्यांबद्दल कळवळा म्हणजे नुसतंच डोळ्यांत पाणी आणून ‘अरेरे’ म्हणणं नसतं तर त्यासाठी कृतीची जोड लागते हे पहायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा. महाराणी ताराबाईंच्या भद्रकाली रुपाची बिजं कशी रोवली गेली हे पहायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा. केवळ पुस्तकं वाचून त्रोटक माहित झालेल्या एका ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा पराक्रमी इतिहास पडद्यावर जिवंत झालेला पहायचा असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा. आता तुम्ही म्हणाल कि चित्रपटात बऱ्याच ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी आहे. तर मी विचारेन कि ती कोणत्या चित्रपटात नसते? इतिहासात घडलेल्या घटनांचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार नसलो तरी ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी अभ्यासून सत्याशी फारकत नसलेली तथ्यपूर्ण सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन प्रेक्षकाच्या मनात स्वदेश, स्वधर्माबद्दल स्फुल्लिंग चेतवणारा चित्रपट नि

शेर शिवराज

Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये पहिल्या पाचांत ‘शेर शिवराज’चं नाव नक्की घेतलं जाईल. मला हा चित्रपट अतिशय आवडला. ‘फर्जंद’मध्ये ज्या उणीवा जाणवल्या होत्या, त्या ह्या चित्रपटात जाणवत नाहीत. त्या नंतरचे त्यांचे दोन चित्रपट मला पाहता आलेले नाहीत. सिनेमॅटिक लिबर्टी किंवा लूप होल्सबद्दल चर्चा करायला नको. काही गोष्टी अतिशय उशीरा लक्षात येतात. पुढील चित्रपटांमध्ये त्या उणीवाही दूर केलेल्या असतील ह्याची खात्री आहे. एकाच गोष्टीची खंत आहे कि हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा अपूर्ण राहिली. ज्या ऐतिहासिक घटनेचा शेवट लोकांना फार पूर्वीपासून माहित आहे, त्या ऐतिहासिक घटनेतील थरार प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी अडीच तासांचा चित्रपट एक सेकंदही कंटाळवाणा न वाटेल अश्या प्रकारे दिग्दर्शित करणे, कोणत्या संवादांनंतर प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट पसरून त्यांनी चित्रपटगृह डोक्यावर घेतल्यामुळे पुढे सरकलेलं कथानक त्यांच्याकडून चुकवलं जाऊ शकतं हे ओळखून दोन प्रसंगांमध्ये ठेवलेल्या अल्पविरामामध्ये पात्रांचे लूक्स, कॅमेऱ्याची गती आणि पार्श्वसंगीताने त

रुद्र... कॉपी है और बहोत फर्क पडता है!

Image
मूळ मालिकेच्या कथासूत्राला धक्का न लावता फ्रेम टू फ्रेम प्रसंग चित्रीत करण्याऐवजी त्यात स्वत:ची थोडी कल्पनाशक्ती वापरुन लेखक-दिग्दर्शक एक रंजक मालिका सादर करु शकतात. आजच्या स्मार्ट युगात त्याची गरजही आहे कारण तुमची मालिका एका अमूक मालिकेवर आधारलेली आहे हे तुमच्या प्रेक्षकांना कळलं कि ते ती मूळ मालिका पाहून तिच्याशी तुमच्या कलाकृतीची तुलना करणार हे अटळ आहे. मूळ मालिकेच्या फ्रेममध्ये अडकलेल्या आपल्या प्रेक्षकाला बाहेर काढून त्याला आपल्या कलाकृतीशी बांधून ठेवण्यासाठी अधून-मधून आश्चर्याचे धक्के देणं भाग आहे. प्रेक्षक खुर्चीत सरसावून बसण्याऐवजी मूळ मालिकेतील प्रसंगाशी तुमच्या कलाकृतीची तुलना करु लागला आणि मूळ मालिकेमधील त्या प्रसंगाचं सादरीकरण प्रभावी असेल तर तुमच्या प्रेक्षकाच्या उत्साहाला उतरती कळा लागू शकते. मूळ कलाकृतीचा स्रोत माहितच नसलेल्या प्रेक्षकांना मात्र तुमची मालिका रंजक वाटू शकते. कदाचित मूळ मालिका जास्त भारतीय प्रेक्षकांनी पाहिली नसावी हा अंदाज घेऊन ‘रुद्र’मध्ये बदल केले नसावेत. ‘रुद्र’च्या प्रत्येक भागात एक नवीन कथा आहे. ह्या कथेसोबतच रुद्र आणि त्याच्या आसपासच्या त्याच्या

Shyam Singha Roy

Image
कितीही सिनेमे येऊ देत, हिट होऊ देत पण आपल्या क्रशचा सिनेमा त्याच वेळेस रिलीज झाला असेल तर तो आधी पाहिल्याशिवाय बाकी सिनेमे पहायचे नसतात. शास्त्र असतं ते. ✋‍ ‘शाम सिंग रॉय’ पाहिला. आवडला. आवडण्यासारखाच होता तो. आपले दोन आवडते कलाकार एकाच सिनेमात बघायला मिळणं... भाग्य असतं ते. श्यामची व्यक्तिरेखा अतिशय आवडली. उगाच भावनावेशात केलेलं, वासनांध, लेचंपेचं, रडकं प्रेम नाही त्याचं. ‘स्त्री ही कुणाची दासी नसते’ असं तो रोझीला केवळ पटवण्यासाठी सांगत नाही. वेळ आल्यावर तो समजालाही ते दाखवून देतो. आपलं प्रेम तो ज्या रुपात प्रथम पहातो त्याच रुपात तो ते शेवटच्या क्षणापर्यंत जपतो. स्वातंत्र्योत्तर काळातील अस्पृश्यता, देवदासींचं धर्माच्या नावाखाली शोषण करणारा ढोंगी महंत, श्यामचं बंड, त्याचं लेखन, त्याचा स्विकार आणि निषेध ह्या पार्श्वभूमीवर श्याम आणि रोझीमधलं प्रेम फुलत जातं. अनेक घटना ज्या ठळकपणे समोर येतील असं वाटतं त्या येत नाहीत. काही प्रसंगांचा शेवट लौकीकार्थाने जसा व्हायला हवा तसा न होता, श्यामच्या प्रेमकहाणीत जसा व्हायला हवा तसा होतो. काही प्रसंगांचा शेवट पटतही नाही पण चित्रपटाचा शेवट मात्