Posts

Showing posts from March, 2012

कहानी (२०१२) - असत्यामागील सत्याची कहाणी

Image
चित्रपटामधे रहस्य कायम टिकून रहावं, म्हणून पटकथेमधे काही विशेष प्रसंग टाकून प्रेक्षकांना चकवणं हा प्रकार नवीन नाही. आपण चकवले गेलो आहोत, हे प्रेक्षकाला व्यवस्थित समजतं असतं, तरीदेखील अचूक वेळेस होणार्‍या रहस्यभेदाच्या समाधानापोटी ही फसवणूक त्याने मान्य केलेली असते. मात्र चकवण्यासोबतच थेट फसवणं या तंत्राचा देखील वापर करून जेव्हा एखादा दिगदर्शक पटकथेला आकार देतो, तेव्हा प्रेक्षक या कथेशी शेवटपर्यंत एकरूप होईल आणि फसवणूक व चकवलं जाणं या दोन्हीमधला फरक समजून घेण्याची उसंत त्याला मिळणारच नाही, हा पुरेपूर आत्मविश्वास त्या दिग्दर्शकाने बाळगला असला पाहिजे. ’कहानी’पुरतं बोलायचं झालं तर दिग्दर्शक सुजोय घोष हेच ’कहानी’चे संहिताकार असल्यामुळे असा सार्थ आत्माविश्वास जर त्यांना आला असेल, तर त्यात काहीच नवल नाही. साध्या सरधोपट कथेला अनपेक्षित वळणे देत, प्रेक्षकाची मानसिकता लक्षात घेऊन अचूकपणे चकवत व फसवत त्याला चित्रपटाच्या अंतापर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवण्याचं कसब सुजोय घोषनी साध्य केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाच्या जाहिरातींमुळे ’कहानी’ची जितकी कथा वाचली, पाहिली त्यातून प्रेक्षकाला इतकं कळलेलं आहे क