Posts

Showing posts from 2023

4DX - बोगस थरार

सिनेमातील वातावरणाची प्रसंगानुरूप अनुभूति प्रेक्षकाला देणे म्हणजे 4DX. ही अनुभूति अर्थातच शंभर टक्के नसते. नाहीतर सिनेमात गोळ्या झाडल्या गेल्या की आपल्याही आजूबाजूने गोळ्या सुटताना दिसतील. तर तेवढ्या गंभीर पातळीवर अद्याप तरी अनुभव दिला जात नाही पण एका सुरक्षित पातळीपर्यंत प्रेक्षकाला सिनेमातील प्रसंगाच्या वातावरणाशी एकरूप करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं (त्यात फ्लॅश लाईट्स, धूर, वास, वारा, पाण्याचे शिंतोडे, साखळ्या आपटल्याचे आवाज आणि हो... त्या हलत्या-डुलत्या आणि थरथरत्या खुर्च्याही आल्या) त्याला 4DX म्हणतात. पण हा अनुभव प्रत्येक थिएटरमध्ये निराळा असावा. कारण गुगलवर 4DX ची थोडीफार माहिती काढून गेल्यावर सिनेपॉलिसमध्ये मिशन इम्पॉसिबल बघताना जाणवलं की काहीतरी कमी आहे. आजूबाजूचे प्रेक्षक, पडद्याजवळच्या दरवाजावरचा EXIT चा बोर्ड हे सगळं उजेडात व्यवस्थित दिसत असताना 4DX नावाखाली जे काही सादर केलं गेलं ते तब्बल पावणेतीन तास सहन करणं हेच एक मिशन इम्पॉसिबल झालं आणि पडद्यावरचा मिशन इम्पॉसिबल साहसपट न होता, विनोदीपट होऊन गेला. हलणाऱ्या खुर्च्या असतात हे ठिक आहे पण प्रेक्षकाच्या शरीराला हबक