रुद्र... कॉपी है और बहोत फर्क पडता है!
मूळ मालिकेच्या कथासूत्राला धक्का न लावता फ्रेम टू फ्रेम प्रसंग चित्रीत करण्याऐवजी त्यात स्वत:ची थोडी कल्पनाशक्ती वापरुन लेखक-दिग्दर्शक एक रंजक मालिका सादर करु शकतात. आजच्या स्मार्ट युगात त्याची गरजही आहे कारण तुमची मालिका एका अमूक मालिकेवर आधारलेली आहे हे तुमच्या प्रेक्षकांना कळलं कि ते ती मूळ मालिका पाहून तिच्याशी तुमच्या कलाकृतीची तुलना करणार हे अटळ आहे. मूळ मालिकेच्या फ्रेममध्ये अडकलेल्या आपल्या प्रेक्षकाला बाहेर काढून त्याला आपल्या कलाकृतीशी बांधून ठेवण्यासाठी अधून-मधून आश्चर्याचे धक्के देणं भाग आहे. प्रेक्षक खुर्चीत सरसावून बसण्याऐवजी मूळ मालिकेतील प्रसंगाशी तुमच्या कलाकृतीची तुलना करु लागला आणि मूळ मालिकेमधील त्या प्रसंगाचं सादरीकरण प्रभावी असेल तर तुमच्या प्रेक्षकाच्या उत्साहाला उतरती कळा लागू शकते. मूळ कलाकृतीचा स्रोत माहितच नसलेल्या प्रेक्षकांना मात्र तुमची मालिका रंजक वाटू शकते. कदाचित मूळ मालिका जास्त भारतीय प्रेक्षकांनी पाहिली नसावी हा अंदाज घेऊन ‘रुद्र’मध्ये बदल केले नसावेत. ‘रुद्र’च्या प्रत्येक भागात एक नवीन कथा आहे. ह्या कथेसोबतच रुद्र आणि त्याच्या आसपासच्या त्याच्या