Posts

Showing posts from November, 2013

क्रिश ३ (२०१३)

Image
वर्तमानपत्रातलं समीक्षण वाचून चित्रपटाचा दर्जा ठरवू नये, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बहुतांश वर्तमानपत्रांनी क्रिश ३ च्या दर्जाबद्दल शंका व्यक्त करून हा चित्रपट एखाद्या केबल वाहिनीवर दाखवला जाईपर्यंत प्रेक्षक वाट पाहातील याची व्यवस्था करून ठेवली आहे. तथापि अशा रिव्ह्यू वर विश्वास न ठेवता हा सिनेमा काल चित्रपटगृहात पाहिल्यानंतर अनेक दिवसांनंतर एक चांगला हिंदी चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळालं आणि चांगला चित्रपट म्हणजे मसाला सिनेमा. डोक्याला रोजच्या रोज ताप घेऊन जगणार्‍या सामान्य माणसांना त्यातून सुटका मिळावी म्हणून निराळ्या दुनियेत घेऊन जाणारा एक विरंगुळा हवा असतो, तो या सिनेमाच्या निमित्ताने जरूर मिळेल. हाय व्हॅल्यूज आणि स्वत:चं स्टॅण्डर्ड बिन्डर्ड मेन्टेन करणार्‍यांना या चित्रपटातून काही मिळणार नाही. VFX च्या उच्च पातळीवर बनवलेला हा सिनेमा चित्रपटगृहातच पाहाण्यासारखा आहे. चित्रपटाची कथा ऑलरेडी सर्वांना कळलेली आहेच. राकेश रोशनने क्रिश ३ च्या निमित्ताने धाडसी प्रयोग केला आहे, हे उघड दिसतंय. कोई मिल गया आणि क्रिश हे दोन साय-फाय पट पचवण्याची ताकद भारतीय प्रेक्षकामधे आहे. क्रिश ३ मधे त्याही