Posts

Showing posts from May, 2022

शेर शिवराज

Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये पहिल्या पाचांत ‘शेर शिवराज’चं नाव नक्की घेतलं जाईल. मला हा चित्रपट अतिशय आवडला. ‘फर्जंद’मध्ये ज्या उणीवा जाणवल्या होत्या, त्या ह्या चित्रपटात जाणवत नाहीत. त्या नंतरचे त्यांचे दोन चित्रपट मला पाहता आलेले नाहीत. सिनेमॅटिक लिबर्टी किंवा लूप होल्सबद्दल चर्चा करायला नको. काही गोष्टी अतिशय उशीरा लक्षात येतात. पुढील चित्रपटांमध्ये त्या उणीवाही दूर केलेल्या असतील ह्याची खात्री आहे. एकाच गोष्टीची खंत आहे कि हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा अपूर्ण राहिली. ज्या ऐतिहासिक घटनेचा शेवट लोकांना फार पूर्वीपासून माहित आहे, त्या ऐतिहासिक घटनेतील थरार प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी अडीच तासांचा चित्रपट एक सेकंदही कंटाळवाणा न वाटेल अश्या प्रकारे दिग्दर्शित करणे, कोणत्या संवादांनंतर प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट पसरून त्यांनी चित्रपटगृह डोक्यावर घेतल्यामुळे पुढे सरकलेलं कथानक त्यांच्याकडून चुकवलं जाऊ शकतं हे ओळखून दोन प्रसंगांमध्ये ठेवलेल्या अल्पविरामामध्ये पात्रांचे लूक्स, कॅमेऱ्याची गती आणि पार्श्वसंगीताने त