मॉम (२०१७) - एका आईचा लढा
चित्रपटसृष्टीतलं पुनरागमन कसं असावं ते श्रीदेवीकडे पाहून कळतं. 'आखरी रास्ता’ चित्रपटात सुपरस्टार अमिताभ बच्चनची नायिका असूनही आपल्या वाट्याला आलेली दुय्यम भूमिका साकारल्यानंतर "अमिताभ सोबत काम करताना दुय्यम भूमिका मिळाल्यास चित्रपट करणार नाही", असं म्हणणाऱ्या श्रीदेवीने अनेक वर्षं चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर नव्याने चित्रपटात अभिनय करताना देखील आपल्या वयाला साजेशी आणि नायिका प्रधान भूमिकाच निवडली. ग्लॅमरचा लवलेश नाही पण स्वत्वाची जाणीव असलेली ’इंग्लिश-विंग्लिश’ चित्रपटातील श्रीदेवीची ’शशी गोडबोले’ प्रेक्षकांना भावली. आता त्यानंतर आलेला ’मॉम’ हा चित्रपट देखील श्रीदेवीच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात न खेचेल तरच नवल. देवकी ही एक मध्यमवयीन स्त्री आहे. आर्या ही तिची सावत्र मुलगी आहे. आर्या आजदेखील आपल्या सख्ख्या आईला विसरू शकलेली नाही त्यामुळे देवकीने आपल्या आईची जागा घ्यावी हे तिला आवडलेलं नाही. देवकीला मात्र वाटतं कि कधी ना कधीतरी आर्याला देवकीची आईची माया कळून येईल पण तो दिवस येण्याआधीच असं काही घडतं कि देवकी आणि आर्यामधलं अंतर आणखीन वाढतं. आपण आर