Posts

Showing posts from 2011

द डर्टी पिक्चर (२०११) - क्लास की मासचा?

Image
चित्रपटाची कथा आणि त्याची पार्श्वभूमी सांगावी लागू नये इतकी सर्वांना परिचित आहे, त्यामुळे त्यावर जास्त भाष्य न करता आपण चित्रपट कसा आहे ते पाहू. या सिनेमात विद्या बालनच्या तोंडी एक संवाद आहे - "फिल्में सिर्फ तीन चीजों की वजह से चलती हैं. एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट! ...और मैं एन्टरटेनमेन्ट हूँ." या संवादाशी प्रामाणिक राहून एकता कपूरने संपूर्ण चित्रपटभर एन्टरटेनमेन्ट असेल, असं पाहिलं आहे. ज्या व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांवर आधारित हा चित्रपट आहे, ती व्यक्ती काही ग्रेट होती असं नव्हे. मात्र अशा व्यक्तीरेखेवर आधारित चित्रपट जर बनवायचाच होता, तर ’तशी एन्टरटेनमेन्ट’ देणार्‍या त्या व्यक्तीला प्रत्यक्षात चित्रपटसृष्टीच्या एका वेगळ्या, फारशा न उल्लेखल्या गेलेल्या पैलूचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सतत कसा सामना करावा लागला, हे दाखवताना मात्र एकता कपूरने हात आखडता का घ्यावा याचं कारण समजत नाही. दाक्षिणात्य व काही हिंदी चित्रपटांतून हॉट आयटम सॉंग्ज सादर करणार्‍या ८० च्या दशकातील विजयालक्ष्मी उर्फ सिल्क स्मिता या नटीच्या आयुष्यातील काही निवडक प्रसंगांसोबत रेश्मा उर्फ सि

गॉडसेन्ड (२००४)

Image
शाळेमधे अजूनही परिक्षा किंवा निबंधस्पर्धांमधे निबंध लिहीण्यासाठी एक दोन विषय हटकून देतात - ’विज्ञान शाप की वरदान?’ किंवा ’आधुनिक तंत्रज्ञान - शाप की वरदान?’ मला सारखं असं वाटायचं की ज्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता येतं, त्यासाठी एक हजार शब्दांचा निबंध का लिहावा? विज्ञान किंवा तंत्रज्ञान जी व्यक्ती हाताळणार आहे, त्या व्यक्तीच्या मनोवृत्तीवर हे अवलंबून नाही का? उदाहरणादाखल साधी टूथपिक घ्या. ज्या गोष्टीचा उपयोग मनुष्य दात स्वच्छ राखण्यासाठी करतो, तीच वरकरणी निरूपद्रवी दिसणारी टूथपिकसुद्धा वेळ आली तर शस्त्रासारखी वापरता येतेच ना! म्हणून काय टूथपिकला आपण तोफ म्हणतो का? हां, आता काही गोष्टींची निर्मिती विध्वंसक कार्यासाठीच केली जाते, तो भाग निराळा. पण या काही विशिष्ट गोष्टी जरी विज्ञान किंवा आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवल्या असल्या तरी केवळ विध्वंसक गोष्टींची निर्मिती म्हणजेच विज्ञान किंवा आधुनिक तंत्रज्ञान का पॉल आणि जेसी या सुखी जोडप्याच्या संसारवेलीवर फुललेलं फूल म्हणजे त्यांचा आठ वर्षांचा मुलगा अ‍ॅडम. आईवडिलांचा लाडका अ‍ॅडम स्वभावत:च गोड आहे. पॉल, जेसी आणि अ‍ॅडम हे एकमेकांच्या प्र

पापाराझ्झी (२००४) - खाजगी आयुष्याची अखेर

Image
चित्रपट कलाकारांचे नखरे, त्यांचे पत्रकारांशी, फोटोग्राफर्सशी उडणारे खटके, प्रसंगी होणारी धक्काबुक्की याची सचित्र आणि रसभरीत वर्णनं आपण नेहमीच ऐकतो. चित्रपटासृष्टीसारख्या क्षेत्रात राहूनसुद्धा हे चित्रपट कलाकार प्रसिद्धीमाध्यमांशी फटकून का वागतात? असं नेमकं काय होतं की या कलाकारांचे पत्रकार व फोटोग्राफर्सशी उडणारे खटके इतक्या विकोपाला जातात की प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत जातं? हे प्रकार केवळ चित्रपट कलाकारांच्या बाबतीतच घडतात असं नाही. काही बडी प्रस्थंदेखील अशाप्रकारच्या वादाच्या भोवर्‍यात सापडतात. आपल्यासमोर जे सत्य असतं ते एका फोटोच्या रूपात असतं. हा फोटो क्लिक करण्याआधी नेमकं काय झालं हे आपल्याला माहित नसतं आणि फोटो इतका बोलका असतो की सत्य माहित करून घेण्याची विचारशक्ती आपण गमावून बसतो. ज्याच्या बाबतीत हा प्रकार घडत असतो, ती सिलेब्रिटी व्यक्ती किती मन:स्ताप सहन करत असेल, याची आपण कल्पनाही केलेली नसते. कारण त्यांचं आयुष्य हे आपल्या दृष्टीने खाजगी नसतंच. या चित्रपटाची कथा याच विषयावर बेतलेली आहे. बो लॅरॅमी हा एक उदयोन्मुख अभिनेता एका अ‍ॅक्शनपटाचा हिरो आहे. त्याच्या खाजगी आयुष्यात वारंवार

भयपट... तुम्ही दचकणार की घाबरणार?

Image
भूत, भूतबाधा, मांत्रिक यासारखे विषय हाताळणार्‍या चित्रपटांमधे दोन प्रकार असतात. या दोन प्रकारांमधे एक सूक्ष्मसा फरक असतो. काही चित्रपट प्रेक्षकांना नुसतेच दचकवण्यासाठी बनवलेले असतात. ज्यात असत्यावर सत्याचा विजय असा शेवट असतो किंवा दानव श्रेष्ठ आहे असा चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना बधिर करायला लावणारा असतो. अशाच चित्रपटांची निर्मिती बहुसंख्यवेळा होते, ज्यात भूत प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरता तयार केलं गेलेलं असतं. चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षकाला भिती वाटत रहाते पण ती भुताच्या रूपामुळे वाटणारी भिती असते. रामसे बंधूंचे भूतपट बहुतेकांनी पाहिले असतील. यात प्रेक्षकाला दचकवण्यासाठी जे जे प्रकार करणं शक्य होतं, ते सर्व प्रकार दिग्दर्शकाने केलेले दिसतील. हे चित्रपट सुमार कथानक असूनही सर्वांना आवडले. मात्र त्यातील काही विशिष्ट चित्रपटच नाव आणि कथानकानिशी प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. याचं पहिलं कारण म्हणजे एकतर ’भूत’ या कल्पनेसोबत चित्रपट "कसेही करून चालावेत" म्हणून आवश्यक तो मालमसाला यात भरभरून असायचा, दुसरं म्हणजे भूताचा आणि प्रेक्षकाचा काही परस्परसंबंध असू शकतो ही कल्पनाच या चित

द जनरल्स डॉटर (१९९९) - शोध खर्‍या सत्याचा

Image
सैन्यामधे सार्जंट असलेला पॉल ब्रेनर हा एक सी.आय.डी. एजन्ट सुद्धा आहे. योगायोगाने त्याची ज्या सुंदर कॅप्टन तरूणीशी ओळख होते, तिचा खून झाला असल्याची बातमी त्याला कळते. तिच्या खुनाच्या तपासणीचं काम हातात घेतल्यावर त्याला आणखी एक सत्य कळतं की ही मृत तरूणी नुसतीच कॅप्टन नसून सैन्यातील जनरल कॅम्प्बेल यांची मुलगी एलिझाबेथ कॅम्पबेल आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे व्यथित झालेले जनरल कॅम्पबेल पॉलला आपल्या मुलीचा खुनी शोधून काढण्याचं आवाहन करतात. पॉलच्या जोडीला सॅरा सनहिल नावाची एक रेप स्पेशालिस्टही काम करत असते. खुनाचा तपास करताना मात्र पॉलच्या समोर काही अशा गोष्टी उघड होतात की ज्यामुळे त्याला एलिझाबेथ कॅम्पबेलच्या चारित्र्याविषयी आणि मानसिक संतुलनाविषयी शंका उत्पन्न होऊ लागतात. तो शोध पुढे सुरूच ठेवतो. अखेर पॉल आणि सॅरा या दोघांच्याही समोर येतं ते असतं एलिझाबेथच्या खुनामागचं रक्त गोठवणारं, विदारक सत्य! तीन चतुर्थांश चित्रपटात रहस्यावरची पकड सुंदर आहे. मग मात्र आपल्याला रहस्य काय आहे हे कळू लागतंच. शेवटी एलिझाबेथचा खून कुणी केला हे कळल्यावर आपल्याला विशेष आश्चर्य न वाटता केवळ एक सिनेमॅटीक तडज