गॉडसेन्ड (२००४)
शाळेमधे अजूनही परिक्षा किंवा निबंधस्पर्धांमधे निबंध लिहीण्यासाठी एक दोन विषय हटकून देतात - ’विज्ञान शाप की वरदान?’ किंवा ’आधुनिक तंत्रज्ञान - शाप की वरदान?’ मला सारखं असं वाटायचं की ज्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता येतं, त्यासाठी एक हजार शब्दांचा निबंध का लिहावा? विज्ञान किंवा तंत्रज्ञान जी व्यक्ती हाताळणार आहे, त्या व्यक्तीच्या मनोवृत्तीवर हे अवलंबून नाही का? उदाहरणादाखल साधी टूथपिक घ्या. ज्या गोष्टीचा उपयोग मनुष्य दात स्वच्छ राखण्यासाठी करतो, तीच वरकरणी निरूपद्रवी दिसणारी टूथपिकसुद्धा वेळ आली तर शस्त्रासारखी वापरता येतेच ना! म्हणून काय टूथपिकला आपण तोफ म्हणतो का? हां, आता काही गोष्टींची निर्मिती विध्वंसक कार्यासाठीच केली जाते, तो भाग निराळा. पण या काही विशिष्ट गोष्टी जरी विज्ञान किंवा आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवल्या असल्या तरी केवळ विध्वंसक गोष्टींची निर्मिती म्हणजेच विज्ञान किंवा आधुनिक तंत्रज्ञान का पॉल आणि जेसी या सुखी जोडप्याच्या संसारवेलीवर फुललेलं फूल म्हणजे त्यांचा आठ वर्षांचा मुलगा अॅडम. आईवडिलांचा लाडका अॅडम स्वभावत:च गोड आहे. पॉल, जेसी आणि अॅडम हे एकमेकांच्या प्र