Posts

Showing posts from 2020

बुलबुल (२०२०) - ज्ञात तरीही अज्ञात

Image
रहस्यप्रधान चित्रपटांमध्ये रहस्यभेद होईपर्यंत प्रेक्षकाला कंटाळा येऊ न देणं ही दिग्दर्शकाची जबाबदारी असते. पण वेळेआधीच रहस्यभेद करून मग त्या रहस्याची कारणनिर्मिती हेच मूळ रहस्य आहे याची जाणीव न होऊ देता कथेचा शेवट पाहण्यासाठी प्रेक्षकाला खुर्चीवर खिळवून ठेवणं ह्यात दिगदर्शकाचं खर कसब पणाला लागतं. अनेक चित्रपटांसाठी गीतकार म्हणून काम करणाऱ्या अन्विता दत्त ह्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट पण त्यांच्या दिग्दर्शनात नवखेपणा जाणवत नाही. अनेक चित्रपटांच्या संवादलेखनाचा अनुभ थोडासा कामी आला असावा. गूढ कथासूत्रांची आवड असलेल्या अनुष्का शर्माने निर्माती म्हणून ह्या चित्रपटाची निवड केली नसती तरच नवल! एक गोष्ट सांगायला हवी कि बुलबुल हा भयपट (horror) नाही. तो एक अद्भुतपट (supernatural thriller) आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धाचा काळ वापरल्यामुळे चित्रपटामधून येणारे प्रसंग अधिक समर्थनीय वाटतात. चित्रपटात सर्वात जास्त अभिनय आवडला तो पाओली दामचा. लहानग्या बुलबुलशी बोलताना मत्सरासोबतच आलेला हळूवारपणा, तरूण बुलबुलशी बोलताना दाखवलेला खंवटपणा, जिथे आपली योग्यता विचारात घेतली जाणार नाही तिथे

दिल बेचारा (२०२०)

Image
दिल बेचारा रिलीज झाल्याक्षणी सुशांतचे फॅन्स तो पाहाणार हे अटळ होतं. ह्या सिनेमाचे मी अनेक रिव्ह्यूज वाचले. बऱ्याच जणांनी सिनेमाला १०/१० रेटिंग दिलंय, ते सुशांतच्या प्रेमाखातर. मीदेखील IMDB वर 10/10 रेटिंग दिलंय, त्याचं कारण सुशांत आणि रेहमानच्या संगीताबद्दल असलेला आदर हेच आहे. 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' ह्या हॉलीवूड चित्रपटावरून निर्माण केलेला बॉलीवूडचा 'दिल बेचारा' एका दृष्यापासून अर्धवट, गोंधळलेला आणि घाईघाईत संपवल्यासारखा वाटतो. एका चित्रपटाची कॉपी करूनच हिंदी चित्रपट बनवायचा असेल तर किमान मूळ पाश्चिमात्य चित्रपटाच्या कथेचा गाभा, दृश्यांमधील आशय समजून घेऊन तो बाज भारतीय (हिंदी) चित्रपटात आणणं आवश्यक होतं, ते झालेलं नाही. उलट, नको त्या प्रसंगाची मूळ चित्रपटामधून नक्कल घेऊन ती चुकीच्या ठिकाणी हिंदी चित्रपटात वापरलेली आहे. जे प्रसंग पाश्चिमात्य आणि भारतीय अश्या दोन्ही सिनेमात शोभू शकले असते, आजच्या काळानुसार योग्यदेखील दिसले असते असे प्रसंग वगळून चित्रपटाला इंडियन लूक देण्याचा नादात सिनेमात स्वत:च्या कथानकाची जोड देऊन मूळ कथानकाचा अर्थच बदलला गेला आहे. ही कथा किझ्झी बा