Posts

Showing posts from February, 2012

द व्हिसलब्लोअर (२०१०)

Image
चित्रपट बनवताना काही ठिकाणी सिनेमॅटीक लिबर्टी घेणं हे जसं आवश्यक ठरतं, तसंच चित्रपटाची गरज म्हणून वायफळ दृश्यांवर भर न देता, मोजक्याच पण परिणामकारक दृश्यांमधून प्रेक्षकांपर्यंत योग्य तो संदेश पोहोचवणं हे दिगदर्शकाचं खरं कसब आहे, असं मला वाटतं. एखाद्या नावाजलेल्या, अनुभवी दिग्दर्शकाला कदाचित हे सहज शक्य होऊन जात असेल. मात्र मोजकाच अनुभव असलेला एखादा दिगदर्शक संवेदनशील विषयावरील चित्रपट दिग्दर्शित करताना तो कुठेही अतिरंजित होणार नाही याची काळजी घेऊन, पटकथेला योग्य तो न्याय देत असेल, तर तो निश्चितच कौतुकास पात्र आहे. त्यातूनही अशा चित्रपटाची पटकथा जर सत्यकथा असेल, तर वास्तवात घडून गेलेल्या घटनांवर आधारित पण अनावश्यक तपशील टाळून चित्रित केली जाणारी परिणामकारक दृश्यं आणि त्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाणारी वास्तवातील दाहकता यांचा अचूक समन्वय साधला जाणं हे फारच थोड्या चित्रपटांमधे दिसून येतं. असे चित्रपट महोत्सवांव्यतिरिक्त फारसे चर्चिले जातही नसावेत. कॅथरिन बोल्कोव्हॅक या नेब्रास्का येथील एका पोलिस अधिकारी स्त्रीला बॉस्नियामधे युद्धसमाप्तीनंतर एक शांतीरक्षक म्हणून पाठवण्यात येतं