Posts

Kalki 2898 AD

Image
काल कल्कि पाहिला. चांगला आहे. प्रभासच्या प्रसंगामधला हसू न येणारा विनोद (कारण लहान मुलंसुद्धा हसत नव्हती) वगळता बाकी प्रभासही छान वाटला. मी इथे ४-५ रिव्ह्यू वाचले ह्या सिनेमाचे. त्यात दीपिका ह्या सिनेमात काय करतेय हा प्रश्न विचारलेला दिसला. मला मृणाला ठाकूरला ह्या सिनेमात का घेतलं असेल असाही प्रश्न पडला होता. पण चित्रपट आकर्षक वाटावा म्हणून राजमौली आणि रामगोपाल वर्मादेखील कॅमिओ देणार असतील तर दीपिका का नको? तिच्या भूमिकेला निदान पार्श्वभूमी आहे. असो. दिशा पटानीला विशेष जबाबदारी नसल्यामुळेच चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळालं असावं असं मला वाटतं. लहान मुलं उडत्या गाड्या, मारामारी छान एन्जॉय करत होती. बच्चनबद्दल काय बोलावं? आता वयानुसार अ‍ॅक्शन सीन्स त्यांनी स्वत: केलेले नसले तरी जिथे कॅमेरा त्यांच्यावर फोकस्ड आहे तिथे जो अभिनय त्यांनी केला आहे... ह्यांच्यासारखे कलाकार आता होणे नाही. पंजाबी गाण्याचा, मुळात चित्रपटात गाणी घुसडण्याचाच मोह टाळला तर बरं आहे. ह्या चित्रपटाच्या ३/४ लांबीत केवळ मारामारीची दृश्यं आहेत. एक अतिशय बिनडोक वाटू शकेल असा प्रभास-दिशाचा प्रसंग गाण्यासकट सहन कराव

4DX - बोगस थरार

सिनेमातील वातावरणाची प्रसंगानुरूप अनुभूति प्रेक्षकाला देणे म्हणजे 4DX. ही अनुभूति अर्थातच शंभर टक्के नसते. नाहीतर सिनेमात गोळ्या झाडल्या गेल्या की आपल्याही आजूबाजूने गोळ्या सुटताना दिसतील. तर तेवढ्या गंभीर पातळीवर अद्याप तरी अनुभव दिला जात नाही पण एका सुरक्षित पातळीपर्यंत प्रेक्षकाला सिनेमातील प्रसंगाच्या वातावरणाशी एकरूप करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं (त्यात फ्लॅश लाईट्स, धूर, वास, वारा, पाण्याचे शिंतोडे, साखळ्या आपटल्याचे आवाज आणि हो... त्या हलत्या-डुलत्या आणि थरथरत्या खुर्च्याही आल्या) त्याला 4DX म्हणतात. पण हा अनुभव प्रत्येक थिएटरमध्ये निराळा असावा. कारण गुगलवर 4DX ची थोडीफार माहिती काढून गेल्यावर सिनेपॉलिसमध्ये मिशन इम्पॉसिबल बघताना जाणवलं की काहीतरी कमी आहे. आजूबाजूचे प्रेक्षक, पडद्याजवळच्या दरवाजावरचा EXIT चा बोर्ड हे सगळं उजेडात व्यवस्थित दिसत असताना 4DX नावाखाली जे काही सादर केलं गेलं ते तब्बल पावणेतीन तास सहन करणं हेच एक मिशन इम्पॉसिबल झालं आणि पडद्यावरचा मिशन इम्पॉसिबल साहसपट न होता, विनोदीपट होऊन गेला. हलणाऱ्या खुर्च्या असतात हे ठिक आहे पण प्रेक्षकाच्या शरीराला हबक

रान बाजार

Image
रानबाजार वेबसिरीज पाहिली. ह्या सिरीजला मराठी क्राईम थ्रिलरमध्ये सर्वात वरचं स्थान मिळायला हवं. मालिकेच्या एकेका भागातून अलगदपणे रहस्य उलगडत जातं आणि तो प्रवास कंटाळवाणा नाही हे विशेष. ह्या मालिकेचा दुसरा सिझन येईल असं काहीजण म्हणत होते पण तसं वाटत नाही. ह्या कथेचा अंत तिथेच व्हायला हवा. अर्थात्‌ हे माझं मत झालं.  अभिनय सर्वांचाच आवडला. रोल लहान असो कि मोठा, सर्वांनीच समरसून काम केलं आहे. प्राजक्ता माळी सुरुवातीचे दोन एपिसोड तिच्या हास्यजत्रेतील प्रतिमेमुळे गोड, गुप्पू मुलगी वाटत राहाते पण नंतर ‘रत्ना’ अपील होते. तेजस्वीनी पंडित सुंदर आणि नाजूक दिसते. ही मालिका खूप बोल्ड आहे, शिव्यांचा भडिमार आहे असं बरंच ऐकलं होतं पण स्वत: मालिका पाहिल्यानंतर कळलं कि जितकं आवश्यक आहे तितकंच दाखवलं आहे. डोळ्यांना डिस्टर्ब करेल, मेंदूला झिणझिण्या आणेल असं काहीही दाखवलेलं नाही. सेक्स वर्कर्स, पोलिस, राजकारणी आपल्या खासगी आयुष्यात जसे बोलतील, वागतील तसंच दाखवलं आहे पण त्यातही मर्यादा राखलेली आहे. राजकारण्यांच्या गाडीवर, पोलिसांच्या व्हॅनवर आणि वेश्येच्या दरवाज्यावरच्या दिव्याचा रंग लालच असतो. त्या प्रत्येक

सरसेनापती हंबीरराव

Image
तुम्ही ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ गाणं ऐकलं असेल. आता ‘सात दौडती सात’ ह्या गाण्याचा पडद्यावरला शेवट तुम्हाला काय जाणीव देऊन जातो हे अनुभवायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा. स्वराज्याशी, छत्रपतींशी निष्ठावान असणे म्हणजे काय हे पहायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा. शेतकऱ्यांबद्दल कळवळा म्हणजे नुसतंच डोळ्यांत पाणी आणून ‘अरेरे’ म्हणणं नसतं तर त्यासाठी कृतीची जोड लागते हे पहायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा. महाराणी ताराबाईंच्या भद्रकाली रुपाची बिजं कशी रोवली गेली हे पहायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा. केवळ पुस्तकं वाचून त्रोटक माहित झालेल्या एका ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा पराक्रमी इतिहास पडद्यावर जिवंत झालेला पहायचा असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा. आता तुम्ही म्हणाल कि चित्रपटात बऱ्याच ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी आहे. तर मी विचारेन कि ती कोणत्या चित्रपटात नसते? इतिहासात घडलेल्या घटनांचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार नसलो तरी ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी अभ्यासून सत्याशी फारकत नसलेली तथ्यपूर्ण सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन प्रेक्षकाच्या मनात स्वदेश, स्वधर्माबद्दल स्फुल्लिंग चेतवणारा चित्रपट नि

शेर शिवराज

Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये पहिल्या पाचांत ‘शेर शिवराज’चं नाव नक्की घेतलं जाईल. मला हा चित्रपट अतिशय आवडला. ‘फर्जंद’मध्ये ज्या उणीवा जाणवल्या होत्या, त्या ह्या चित्रपटात जाणवत नाहीत. त्या नंतरचे त्यांचे दोन चित्रपट मला पाहता आलेले नाहीत. सिनेमॅटिक लिबर्टी किंवा लूप होल्सबद्दल चर्चा करायला नको. काही गोष्टी अतिशय उशीरा लक्षात येतात. पुढील चित्रपटांमध्ये त्या उणीवाही दूर केलेल्या असतील ह्याची खात्री आहे. एकाच गोष्टीची खंत आहे कि हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा अपूर्ण राहिली. ज्या ऐतिहासिक घटनेचा शेवट लोकांना फार पूर्वीपासून माहित आहे, त्या ऐतिहासिक घटनेतील थरार प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी अडीच तासांचा चित्रपट एक सेकंदही कंटाळवाणा न वाटेल अश्या प्रकारे दिग्दर्शित करणे, कोणत्या संवादांनंतर प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट पसरून त्यांनी चित्रपटगृह डोक्यावर घेतल्यामुळे पुढे सरकलेलं कथानक त्यांच्याकडून चुकवलं जाऊ शकतं हे ओळखून दोन प्रसंगांमध्ये ठेवलेल्या अल्पविरामामध्ये पात्रांचे लूक्स, कॅमेऱ्याची गती आणि पार्श्वसंगीताने त