द क्वाएट फॅमिली (१९९८)
अवगत नसलेल्या भाषांमधील चित्रपट पहाताना आपल्याला सब-टायटल्सची नितांत आवश्यकता भासते. पण काही चित्रपट असे असतात जिथे सब-टायटल्सची आवश्यकता अतिशय नगण्य असते. वातावरणनिर्मिती आणि पात्रांचे हावभाव यातून चित्रपट सहज पुढे सरकत जातो आणि आपल्याला समजतो. जी-वून-किम लिखित आणि दिग्दर्शित ’द क्वाएट फॅमिली’ हा कोरीयन भाषेतील याच पठडीतला चित्रपट आहे. किमचे चित्रपट मी यापूर्वी पाहिलेले नाहीत पण त्याच्या नावे जमा असलेल्या चित्रपटांचं दर्जांकन पहाता असं वाटतंय की या दिग्दर्शकाचे चित्रपट एकदा तरी पहायला हवेत. द क्वाएट फॅमिली’ची कथा एका कुटुंबाची आहे. ट्रेकींगला जाणार्या येणार्यांची सोय व आपल्याला अर्थप्राप्ती या उद्देशाने या कुटुंबाने एक लॉज उघडलेलं आहे. पण अनेक दिवस वाट पाहूनसुद्धा या लॉजकडे चिटपाखरू देखील फिरकत नाही. आपलं नशीबच खराब आहे, असं समजून पाहुण्यांची वाट पहाण्याव्यतिरिक्त या कुटुंबाच्या हाती काही उरलेलंच नसतं. तशातच त्यांच्या लॉजमधे पहिला-वहिला पाहुणा येतो. संपूर्ण कुटुंबाला आनंद होतो की आता आपलं नशीब पालटेल. पण घडतं उलटंच! लॉजमधे उतरलेल्या पाहुण्याला सकाळी उठवायला गेल्यानंतर या कुटुंबाच