Posts

Showing posts from 2012

एक था टायगर (२०१२) - रेसिपी

Image
पदार्थ - एक था लव्हर मुख्य साहित्य: १ पाकिट मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस स्मिथ सिनेमा १ आख्खा सलमान (जून असावा) १ आख्खी कतरिना (फार कोवळी नको) संवाद चवीपुरते फोडणीसाठी: १/४ टेबलस्पून इंग्रजी ट्वेन्टी फोर सिरीजचे स्टंट्स २ टेबलस्पून इराक किंवा टर्कीचं लोकेशन ४/५ प्रेमळ गाणी १ टिस्पून क्यूबाचं लोकेशन कृती: १. सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात सलमान व कतरिना व्यवस्थित ढवळून किमान ३ ते ४ वर्षे बाजूला ठेवून द्यावेत. म्हणजे ते चांगले मुरतात. २. आता या मुरलेल्या मिश्रणात एक पाकिट मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस स्मिथ घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. ३. फोडणीसाठी ३ तास शिजण्यास मावेल एवढ्या मोठ्या कढईत ट्वेन्टी फोर सिरीजचे स्टंट्स गरम करावेत. त्यात इराक किंवा टर्कीचं लोकेशन टाकावे. ४. तडतड असा आवाज झाला की एक गाणं बाजूला काढून इतर सर्व गाणी यात टाकावीत व मिश्रण चांगलं परतून घ्यावं. ४. आता यात १ टिस्पून क्यूबाचं लोकेशन टाकावं व पुन्हा परतून घ्यावं. ५. सर्वात आधी मोठ्या पातेल्यात सलमान-कतरिनाचं जे मिश्रण ढवळून ठेवलं होतं, ते या कढईत ओतावं व नीट परतून घ्यावं आणि किमान तीन तास हा पदार्थ शिजवावा. ६

कहानी (२०१२) - असत्यामागील सत्याची कहाणी

Image
चित्रपटामधे रहस्य कायम टिकून रहावं, म्हणून पटकथेमधे काही विशेष प्रसंग टाकून प्रेक्षकांना चकवणं हा प्रकार नवीन नाही. आपण चकवले गेलो आहोत, हे प्रेक्षकाला व्यवस्थित समजतं असतं, तरीदेखील अचूक वेळेस होणार्‍या रहस्यभेदाच्या समाधानापोटी ही फसवणूक त्याने मान्य केलेली असते. मात्र चकवण्यासोबतच थेट फसवणं या तंत्राचा देखील वापर करून जेव्हा एखादा दिगदर्शक पटकथेला आकार देतो, तेव्हा प्रेक्षक या कथेशी शेवटपर्यंत एकरूप होईल आणि फसवणूक व चकवलं जाणं या दोन्हीमधला फरक समजून घेण्याची उसंत त्याला मिळणारच नाही, हा पुरेपूर आत्मविश्वास त्या दिग्दर्शकाने बाळगला असला पाहिजे. ’कहानी’पुरतं बोलायचं झालं तर दिग्दर्शक सुजोय घोष हेच ’कहानी’चे संहिताकार असल्यामुळे असा सार्थ आत्माविश्वास जर त्यांना आला असेल, तर त्यात काहीच नवल नाही. साध्या सरधोपट कथेला अनपेक्षित वळणे देत, प्रेक्षकाची मानसिकता लक्षात घेऊन अचूकपणे चकवत व फसवत त्याला चित्रपटाच्या अंतापर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवण्याचं कसब सुजोय घोषनी साध्य केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाच्या जाहिरातींमुळे ’कहानी’ची जितकी कथा वाचली, पाहिली त्यातून प्रेक्षकाला इतकं कळलेलं आहे क

द व्हिसलब्लोअर (२०१०)

Image
चित्रपट बनवताना काही ठिकाणी सिनेमॅटीक लिबर्टी घेणं हे जसं आवश्यक ठरतं, तसंच चित्रपटाची गरज म्हणून वायफळ दृश्यांवर भर न देता, मोजक्याच पण परिणामकारक दृश्यांमधून प्रेक्षकांपर्यंत योग्य तो संदेश पोहोचवणं हे दिगदर्शकाचं खरं कसब आहे, असं मला वाटतं. एखाद्या नावाजलेल्या, अनुभवी दिग्दर्शकाला कदाचित हे सहज शक्य होऊन जात असेल. मात्र मोजकाच अनुभव असलेला एखादा दिगदर्शक संवेदनशील विषयावरील चित्रपट दिग्दर्शित करताना तो कुठेही अतिरंजित होणार नाही याची काळजी घेऊन, पटकथेला योग्य तो न्याय देत असेल, तर तो निश्चितच कौतुकास पात्र आहे. त्यातूनही अशा चित्रपटाची पटकथा जर सत्यकथा असेल, तर वास्तवात घडून गेलेल्या घटनांवर आधारित पण अनावश्यक तपशील टाळून चित्रित केली जाणारी परिणामकारक दृश्यं आणि त्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाणारी वास्तवातील दाहकता यांचा अचूक समन्वय साधला जाणं हे फारच थोड्या चित्रपटांमधे दिसून येतं. असे चित्रपट महोत्सवांव्यतिरिक्त फारसे चर्चिले जातही नसावेत. कॅथरिन बोल्कोव्हॅक या नेब्रास्का येथील एका पोलिस अधिकारी स्त्रीला बॉस्नियामधे युद्धसमाप्तीनंतर एक शांतीरक्षक म्हणून पाठवण्यात येतं

द क्वाएट फॅमिली (१९९८)

Image
अवगत नसलेल्या भाषांमधील चित्रपट पहाताना आपल्याला सब-टायटल्सची नितांत आवश्यकता भासते. पण काही चित्रपट असे असतात जिथे सब-टायटल्सची आवश्यकता अतिशय नगण्य असते. वातावरणनिर्मिती आणि पात्रांचे हावभाव यातून चित्रपट सहज पुढे सरकत जातो आणि आपल्याला समजतो. जी-वून-किम लिखित आणि दिग्दर्शित ’द क्वाएट फॅमिली’ हा कोरीयन भाषेतील याच पठडीतला चित्रपट आहे. किमचे चित्रपट मी यापूर्वी पाहिलेले नाहीत पण त्याच्या नावे जमा असलेल्या चित्रपटांचं दर्जांकन पहाता असं वाटतंय की या दिग्दर्शकाचे चित्रपट एकदा तरी पहायला हवेत. द क्वाएट फॅमिली’ची कथा एका कुटुंबाची आहे. ट्रेकींगला जाणार्‍या येणार्‍यांची सोय व आपल्याला अर्थप्राप्ती या उद्देशाने या कुटुंबाने एक लॉज उघडलेलं आहे. पण अनेक दिवस वाट पाहूनसुद्धा या लॉजकडे चिटपाखरू देखील फिरकत नाही. आपलं नशीबच खराब आहे, असं समजून पाहुण्यांची वाट पहाण्याव्यतिरिक्त या कुटुंबाच्या हाती काही उरलेलंच नसतं. तशातच त्यांच्या लॉजमधे पहिला-वहिला पाहुणा येतो. संपूर्ण कुटुंबाला आनंद होतो की आता आपलं नशीब पालटेल. पण घडतं उलटंच! लॉजमधे उतरलेल्या पाहुण्याला सकाळी उठवायला गेल्यानंतर या कुटुंबाच