सरसेनापती हंबीरराव

तुम्ही ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ गाणं ऐकलं असेल. आता ‘सात दौडती सात’ ह्या गाण्याचा पडद्यावरला शेवट तुम्हाला काय जाणीव देऊन जातो हे अनुभवायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा.

स्वराज्याशी, छत्रपतींशी निष्ठावान असणे म्हणजे काय हे पहायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा.

शेतकऱ्यांबद्दल कळवळा म्हणजे नुसतंच डोळ्यांत पाणी आणून ‘अरेरे’ म्हणणं नसतं तर त्यासाठी कृतीची जोड लागते हे पहायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा.

महाराणी ताराबाईंच्या भद्रकाली रुपाची बिजं कशी रोवली गेली हे पहायचं असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा.

केवळ पुस्तकं वाचून त्रोटक माहित झालेल्या एका ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा पराक्रमी इतिहास पडद्यावर जिवंत झालेला पहायचा असेल तर #सरसेनापती_हंबीरराव पहा.



आता तुम्ही म्हणाल कि चित्रपटात बऱ्याच ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी आहे. तर मी विचारेन कि ती कोणत्या चित्रपटात नसते? इतिहासात घडलेल्या घटनांचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार नसलो तरी ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी अभ्यासून सत्याशी फारकत नसलेली तथ्यपूर्ण सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन प्रेक्षकाच्या मनात स्वदेश, स्वधर्माबद्दल स्फुल्लिंग चेतवणारा चित्रपट निर्माण केला जाणार असेल तर अशी सिनेमॅटिक लिबर्टी आपल्याला मान्य असायला हवी.

दर तीन वाक्यांनंतर येणारे दणकेबाज संवाद असोत, साहस्यदृश्यं असोत, पटकथा, गीत, संगीत, लेखन, अभिनय, दिग्दर्शन... हा चित्रपट ऐतिहासिक चित्रपटांच्या वर्गवारीत उजवा आहे.

‘पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआप बदलतील’ - ह्या वाक्यासाठी Pravin Vitthal Tarde ना 🙏‍

Book My Show आणि IMDB वरही रेटिंग दिले आहे.

Kanchan Karai #marathimovie #sarsenapati #HambirraoMohite

Comments