ट्वेन्टी वन (२००८) - मोजूनमापून जुगार
बेन कॅम्पबेल हा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी आहे. बोस्टनला रहाणा-या या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे की स्वत:च्या बळावर हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिकल सायन्सची शिष्यवृत्ती मिळवून डॉक्टर व्हायचं. ३ मिलियन डॉलर्सची आवश्यकता असते. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या बेनला साहजिकच हे शक्य नसतं. इतके पैसे गोळा करता करता आपल्याला चार-पाच वर्षं तरी सहज लागतीलच ही चिंता सतत त्याचं मन खात असते. बेन त्याच्या इतर दोन मित्रांसमवेत एक छोटं स्वयंचलीत चाक तयार करण्याच्या प्रोजेक्टवरही काम करत असतो पण या गोष्टीचाही उपयोग त्याला शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी होत नाही. पैसे कसे मिळवावेत याचा विचार करतच बेन गणिताच्या वर्गात बसलेला असतो. आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर दिलेल्या व्यावहारीक उत्तराने तो प्राचार्य मिकी रोसा यांचं मन जिंकतो. पण प्राचार्य मिकी यांना बेनच्या बुद्धीमत्तेचा वापर वेगळ्याच कारणासाठी करायचा असतो. एके दिवशी बेन लायब्ररीमधे आपला अभ्यास करत असताना, त्याला एक मुलगा आपल्या मागोमाग यायला सांगतो. बेन त्याच्या मागोमाग जिथे पोहोचतो तिथे प्राचार्य मिकी रोसा हे काही खास व्यक्तींबरोबर उपस्थित अस...