Posts

Showing posts from April, 2010

बॉईज डोन्ट क्राय (१९९९) - तिच्यातल्या 'त्या'ची घुसमट

Image
स्त्रीने पुरूषाची भूमिका साकारलेले चित्रपट कमी नाहीत. शी’ज द मॅन' या चित्रपटातील अमॅन्डा बायन्सने साकारलेला सबॅस्टीअन आणि त्याच चित्रपटातील कल्पनेवर आधारीत भारतीय हिंदी चित्रपट 'दिल बोले हडीप्पा' मधील रानी मुखर्जीने साकारलेला वीर ही अगदी ताजी उदाहरणं आहेत. मात्र भारतीय चित्रपटातील स्त्री भूमिका करताना काही निवडक अपवाद वगळता पुरूष कलाकार जो बिभत्सपणा दाखवतात किंवा स्त्री कलाकार पुरूषाची भूमिका करताना जे काही केविलवाणे प्रकार करतात, त्याच्या तुलनेत हिलरी स्वॅन्क ने साकारलेला ब्रॅन्डन कितीतरी प्रभावी वाटतो. ज्यांना हिलरी स्वॅन्क माहिती नसेल त्यांना तर ब्रॅन्डन हे पात्र मुळात स्त्री आहे, हे जोपर्यंत चित्रपटात त्याचा उल्लेख होत नाही, तो पर्यंत कळणारच नाही. जन्माने स्त्री असलेल्या परंतू मनाने पुरुष असलेल्या टीना ब्रॅन्डनची ही कथा. ब्रॅन्डन वृत्तीने पुरूष असल्याने त्याला स्त्रीयांमधे रस असतो. पण आपण स्त्रीसारखं दिसत राहिलो, तर कुठलीच स्त्री आपल्याकडे आकर्षित होणार नाही, हे ब्रॅन्डनच्या लक्षात येत म्हणून ब्रॅन्डन पुरूषासारखा रहायला लागतो. पुरूषासारखं वागणं, बोलणं, दिसणं शिवाय त्या...