Posts

Showing posts from 2009

'गैर' (२००९) पहाण्यात काहीच गैर नाही

Image
मराठी रहस्यप्रधान चित्रपटांबद्दल अपेक्षा उंचावणारा चित्रपट म्हणजे ’गैर’. मराठीतही असा सस्पेन्स थ्रिलर असू शकतो यावर विश्वासच बसत नाही. उत्कृष्ट कथेला तितक्याच ताकदीच्या दिग्दर्शनाची व निर्मितीची जोड असेल तर मराठी चित्रपटात काय घडू शकतं हे तुम्ही गैर मधे पहाच! चित्रपट पहात असताना, ’अरे हे काय दाखवलंय, असं का.... असं का नाही, हे पटत नाही’, असे बरेच प्रश्‍न तुमच्या मनात येतील पण.... त्या सर्व प्रश्नांना चित्रपटाच्या अखेरपर्यंत थोपवून धरा. सतीश राजवाडे हे उत्तम दिग्दर्शक आहेत, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केलेलं आहे. गैर चित्रपटातील त्यांच्या खास ’टच’ मुळे चित्रपटाला सुंदर गती लाभली आहे. उत्सुकता शेवटपर्यंत ताणून ठेवण्यात 'गैर' यशस्वी ठरला आहे. चित्रपटात निर्माते संजय घोडावत यांच्या दिमाखदार कार्स वापरल्या असल्या तरी त्यांचं कुठेही अवाजवी प्रदर्शन नाही. अगदी चॉपरचा वापरही मोजकाच पण नेमक्या वेळेस केलेला आहे. तरीही चित्रपटाला ग्लॅमरस व फ्रेश लूक देण्यात निर्माता व दिग्दर्शक दोघेही यशस्वी ठरले आहेत. सतीश राजवाड्यांना तरूण पिढीची ’नॅक’ सापडली आहे. या चित्रपटात गाणी आहेत पण ती आवश्यक...