Posts

बुलबुल (२०२०) - ज्ञात तरीही अज्ञात

Image
रहस्यप्रधान चित्रपटांमध्ये रहस्यभेद होईपर्यंत प्रेक्षकाला कंटाळा येऊ न देणं ही दिग्दर्शकाची जबाबदारी असते. पण वेळेआधीच रहस्यभेद करून मग त्या रहस्याची कारणनिर्मिती हेच मूळ रहस्य आहे याची जाणीव न होऊ देता कथेचा शेवट पाहण्यासाठी प्रेक्षकाला खुर्चीवर खिळवून ठेवणं ह्यात दिगदर्शकाचं खर कसब पणाला लागतं. अनेक चित्रपटांसाठी गीतकार म्हणून काम करणाऱ्या अन्विता दत्त ह्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट पण त्यांच्या दिग्दर्शनात नवखेपणा जाणवत नाही. अनेक चित्रपटांच्या संवादलेखनाचा अनुभ थोडासा कामी आला असावा. गूढ कथासूत्रांची आवड असलेल्या अनुष्का शर्माने निर्माती म्हणून ह्या चित्रपटाची निवड केली नसती तरच नवल! एक गोष्ट सांगायला हवी कि बुलबुल हा भयपट (horror) नाही. तो एक अद्भुतपट (supernatural thriller) आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धाचा काळ वापरल्यामुळे चित्रपटामधून येणारे प्रसंग अधिक समर्थनीय वाटतात. चित्रपटात सर्वात जास्त अभिनय आवडला तो पाओली दामचा. लहानग्या बुलबुलशी बोलताना मत्सरासोबतच आलेला हळूवारपणा, तरूण बुलबुलशी बोलताना दाखवलेला खंवटपणा, जिथे आपली योग्यता विचारात घेतली जाणार नाही तिथे ...

दिल बेचारा (२०२०)

Image
दिल बेचारा रिलीज झाल्याक्षणी सुशांतचे फॅन्स तो पाहाणार हे अटळ होतं. ह्या सिनेमाचे मी अनेक रिव्ह्यूज वाचले. बऱ्याच जणांनी सिनेमाला १०/१० रेटिंग दिलंय, ते सुशांतच्या प्रेमाखातर. मीदेखील IMDB वर 10/10 रेटिंग दिलंय, त्याचं कारण सुशांत आणि रेहमानच्या संगीताबद्दल असलेला आदर हेच आहे. 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' ह्या हॉलीवूड चित्रपटावरून निर्माण केलेला बॉलीवूडचा 'दिल बेचारा' एका दृष्यापासून अर्धवट, गोंधळलेला आणि घाईघाईत संपवल्यासारखा वाटतो. एका चित्रपटाची कॉपी करूनच हिंदी चित्रपट बनवायचा असेल तर किमान मूळ पाश्चिमात्य चित्रपटाच्या कथेचा गाभा, दृश्यांमधील आशय समजून घेऊन तो बाज भारतीय (हिंदी) चित्रपटात आणणं आवश्यक होतं, ते झालेलं नाही. उलट, नको त्या प्रसंगाची मूळ चित्रपटामधून नक्कल घेऊन ती चुकीच्या ठिकाणी हिंदी चित्रपटात वापरलेली आहे. जे प्रसंग पाश्चिमात्य आणि भारतीय अश्या दोन्ही सिनेमात शोभू शकले असते, आजच्या काळानुसार योग्यदेखील दिसले असते असे प्रसंग वगळून चित्रपटाला इंडियन लूक देण्याचा नादात सिनेमात स्वत:च्या कथानकाची जोड देऊन मूळ कथानकाचा अर्थच बदलला गेला आहे. ही कथा किझ्झी बा...

मॉम (२०१७) - एका आईचा लढा

Image
चित्रपटसृष्टीतलं पुनरागमन कसं असावं ते श्रीदेवीकडे पाहून कळतं. 'आखरी रास्ता’ चित्रपटात सुपरस्टार अमिताभ बच्चनची नायिका असूनही आपल्या वाट्याला आलेली दुय्यम भूमिका साकारल्यानंतर "अमिताभ सोबत काम करताना दुय्यम भूमिका मिळाल्यास चित्रपट करणार नाही", असं म्हणणाऱ्या श्रीदेवीने अनेक वर्षं चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर नव्याने चित्रपटात अभिनय करताना देखील आपल्या वयाला साजेशी आणि नायिका प्रधान भूमिकाच निवडली. ग्लॅमरचा लवलेश नाही पण स्वत्वाची जाणीव असलेली ’इंग्लिश-विंग्लिश’ चित्रपटातील श्रीदेवीची ’शशी गोडबोले’ प्रेक्षकांना भावली. आता त्यानंतर आलेला ’मॉम’ हा चित्रपट देखील श्रीदेवीच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात न खेचेल तरच नवल. देवकी ही एक मध्यमवयीन स्त्री आहे. आर्या ही तिची सावत्र मुलगी आहे. आर्या आजदेखील आपल्या सख्ख्या आईला विसरू शकलेली नाही त्यामुळे देवकीने आपल्या आईची जागा घ्यावी हे तिला आवडलेलं नाही. देवकीला मात्र वाटतं कि कधी ना कधीतरी आर्याला देवकीची आईची माया कळून येईल पण तो दिवस येण्याआधीच असं काही घडतं कि देवकी आणि आर्यामधलं अंतर आणखीन वाढतं. आपण आर...

क्रिश ३ (२०१३)

Image
वर्तमानपत्रातलं समीक्षण वाचून चित्रपटाचा दर्जा ठरवू नये, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बहुतांश वर्तमानपत्रांनी क्रिश ३ च्या दर्जाबद्दल शंका व्यक्त करून हा चित्रपट एखाद्या केबल वाहिनीवर दाखवला जाईपर्यंत प्रेक्षक वाट पाहातील याची व्यवस्था करून ठेवली आहे. तथापि अशा रिव्ह्यू वर विश्वास न ठेवता हा सिनेमा काल चित्रपटगृहात पाहिल्यानंतर अनेक दिवसांनंतर एक चांगला हिंदी चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळालं आणि चांगला चित्रपट म्हणजे मसाला सिनेमा. डोक्याला रोजच्या रोज ताप घेऊन जगणार्‍या सामान्य माणसांना त्यातून सुटका मिळावी म्हणून निराळ्या दुनियेत घेऊन जाणारा एक विरंगुळा हवा असतो, तो या सिनेमाच्या निमित्ताने जरूर मिळेल. हाय व्हॅल्यूज आणि स्वत:चं स्टॅण्डर्ड बिन्डर्ड मेन्टेन करणार्‍यांना या चित्रपटातून काही मिळणार नाही. VFX च्या उच्च पातळीवर बनवलेला हा सिनेमा चित्रपटगृहातच पाहाण्यासारखा आहे. चित्रपटाची कथा ऑलरेडी सर्वांना कळलेली आहेच. राकेश रोशनने क्रिश ३ च्या निमित्ताने धाडसी प्रयोग केला आहे, हे उघड दिसतंय. कोई मिल गया आणि क्रिश हे दोन साय-फाय पट पचवण्याची ताकद भारतीय प्रेक्षकामधे आहे. क्रिश ३ मधे त्याही...

एक था टायगर (२०१२) - रेसिपी

Image
पदार्थ - एक था लव्हर मुख्य साहित्य: १ पाकिट मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस स्मिथ सिनेमा १ आख्खा सलमान (जून असावा) १ आख्खी कतरिना (फार कोवळी नको) संवाद चवीपुरते फोडणीसाठी: १/४ टेबलस्पून इंग्रजी ट्वेन्टी फोर सिरीजचे स्टंट्स २ टेबलस्पून इराक किंवा टर्कीचं लोकेशन ४/५ प्रेमळ गाणी १ टिस्पून क्यूबाचं लोकेशन कृती: १. सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात सलमान व कतरिना व्यवस्थित ढवळून किमान ३ ते ४ वर्षे बाजूला ठेवून द्यावेत. म्हणजे ते चांगले मुरतात. २. आता या मुरलेल्या मिश्रणात एक पाकिट मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस स्मिथ घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. ३. फोडणीसाठी ३ तास शिजण्यास मावेल एवढ्या मोठ्या कढईत ट्वेन्टी फोर सिरीजचे स्टंट्स गरम करावेत. त्यात इराक किंवा टर्कीचं लोकेशन टाकावे. ४. तडतड असा आवाज झाला की एक गाणं बाजूला काढून इतर सर्व गाणी यात टाकावीत व मिश्रण चांगलं परतून घ्यावं. ४. आता यात १ टिस्पून क्यूबाचं लोकेशन टाकावं व पुन्हा परतून घ्यावं. ५. सर्वात आधी मोठ्या पातेल्यात सलमान-कतरिनाचं जे मिश्रण ढवळून ठेवलं होतं, ते या कढईत ओतावं व नीट परतून घ्यावं आणि किमान तीन तास हा पदार्थ शिजवावा. ६...