Kalki 2898 AD
काल कल्कि पाहिला. चांगला आहे. प्रभासच्या प्रसंगामधला हसू न येणारा विनोद (कारण लहान मुलंसुद्धा हसत नव्हती) वगळता बाकी प्रभासही छान वाटला. मी इथे ४-५ रिव्ह्यू वाचले ह्या सिनेमाचे. त्यात दीपिका ह्या सिनेमात काय करतेय हा प्रश्न विचारलेला दिसला. मला मृणाला ठाकूरला ह्या सिनेमात का घेतलं असेल असाही प्रश्न पडला होता. पण चित्रपट आकर्षक वाटावा म्हणून राजमौली आणि रामगोपाल वर्मादेखील कॅमिओ देणार असतील तर दीपिका का नको? तिच्या भूमिकेला निदान पार्श्वभूमी आहे. असो. दिशा पटानीला विशेष जबाबदारी नसल्यामुळेच चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळालं असावं असं मला वाटतं. लहान मुलं उडत्या गाड्या, मारामारी छान एन्जॉय करत होती. बच्चनबद्दल काय बोलावं? आता वयानुसार अॅक्शन सीन्स त्यांनी स्वत: केलेले नसले तरी जिथे कॅमेरा त्यांच्यावर फोकस्ड आहे तिथे जो अभिनय त्यांनी केला आहे... ह्यांच्यासारखे कलाकार आता होणे नाही. पंजाबी गाण्याचा, मुळात चित्रपटात गाणी घुसडण्याचाच मोह टाळला तर बरं आहे. ह्या चित्रपटाच्या ३/४ लांबीत केवळ मारामारीची दृश्यं आहेत. एक अतिशय बिनडोक वाटू शकेल असा प्रभास-दिशाचा प्रसंग गाण्यासकट सहन कराव...