Posts

Showing posts from January, 2022

Shyam Singha Roy

Image
कितीही सिनेमे येऊ देत, हिट होऊ देत पण आपल्या क्रशचा सिनेमा त्याच वेळेस रिलीज झाला असेल तर तो आधी पाहिल्याशिवाय बाकी सिनेमे पहायचे नसतात. शास्त्र असतं ते. ✋‍ ‘शाम सिंग रॉय’ पाहिला. आवडला. आवडण्यासारखाच होता तो. आपले दोन आवडते कलाकार एकाच सिनेमात बघायला मिळणं... भाग्य असतं ते. श्यामची व्यक्तिरेखा अतिशय आवडली. उगाच भावनावेशात केलेलं, वासनांध, लेचंपेचं, रडकं प्रेम नाही त्याचं. ‘स्त्री ही कुणाची दासी नसते’ असं तो रोझीला केवळ पटवण्यासाठी सांगत नाही. वेळ आल्यावर तो समजालाही ते दाखवून देतो. आपलं प्रेम तो ज्या रुपात प्रथम पहातो त्याच रुपात तो ते शेवटच्या क्षणापर्यंत जपतो. स्वातंत्र्योत्तर काळातील अस्पृश्यता, देवदासींचं धर्माच्या नावाखाली शोषण करणारा ढोंगी महंत, श्यामचं बंड, त्याचं लेखन, त्याचा स्विकार आणि निषेध ह्या पार्श्वभूमीवर श्याम आणि रोझीमधलं प्रेम फुलत जातं. अनेक घटना ज्या ठळकपणे समोर येतील असं वाटतं त्या येत नाहीत. काही प्रसंगांचा शेवट लौकीकार्थाने जसा व्हायला हवा तसा न होता, श्यामच्या प्रेमकहाणीत जसा व्हायला हवा तसा होतो. काही प्रसंगांचा शेवट पटतही नाही पण चित्रपटाचा शेवट मात्...